दिल्ली ते पुणे via विमान!

आयुष्यात काही गोष्टी कायम आठवणीत राहतात. काही दिवस, काही आठवणी, काही प्रवास ... मनात घर घर करून जातात. माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रवास आहेत आणि त्यातला एक - माझा दिल्ली ते पुणे प्रवास.

लहान भावाच लग्न आणि नाशिकला जाण, म्हणजे पुणे आलेच. आता तुम्ही म्हणाल, नाशिकला जायचं मग पुणे का? अहो दिल्ली वरून नाशिकला डायरेक्ट फ्लाईट नाही, दिल्ली ते नाशिक आणि पुढे, पुणे ते नाशिक बसन जाव लागत. बर असू द्या. माझ्या प्रवास बद्दल बोलतो थोड...

आम्ही दिल्ली विमान तळावर गेलो. नेहमी प्रमाणे विमान काही वेळेवर नव्हते. बसलो वाट बघत, कधी एकदाची फ्लाईट announcement होते. आजू बाजूला बरीच मंडळी होती. तेव्हा मला जाणीव झाली कि दिल्ली मध्ये बरेच मराठी लोक राहतात. का जाने, अस वाटल कि सर्व विमान तळ आपल्या मराठी माणसांनी भरलेलं आहे. जिकडे बघाव , मराठी संवाद! थोड्या वेळान announcement झाली - की विमान तैयार आहे. मी ही आपला एकदम खुश झालो. आपली family घेऊन निघालो, विमानात बसायला. बघतो तर काय, एकदम गोंधळ होता सर्वीकडे. बरीच मंडळी एकदम गडबडल्या सारखी वाटत होती. बहुधा हा ह्यांचा पहिलाच विमान प्रवास असावा अशी शंका माझ्या मनात आली. ही शंका नंतर खरी निघाली ही दुसरी गोष्ट!

आम्ही विमानात आलो. क्षणभर सगळा सावळा गोंधळ झाल्यागत वाटल. एकदम धुमाकूळ होता विमानात, एखाद्या  महाराष्ट्र महामंडळाची एस टी बस मध्ये असतो तसा. सामान ठेवण्याची घाई प्रत्येक प्रवाश्याच्या चेहर्यावर  दिसत होती. आता मी सामान ठेवलं नाही तर, मला ते मांडीवर घेऊन बसव लागता कि काय, असा प्रश्नं प्रत्येकाच्या मनात होता बहुधा!

थोड्याच वेळात एक काका तहानलेल वाटले. त्यांनी हवाई सुंदरीला पाणी आणायला सांगितलं. सुंदरी त्यांना म्हणाली "Please press the help button to call me next time." बस!!! ... आजू बाजूच्या प्रवाशांनी हे ऐकल! बघतो तर काय ... निव्वळ १ मिनिटात १५-२० ठिकाणी मी "Help Button" ON बघितलं. हवाई सुंदरीच्या चेहर्यावरचे हावभाव मी इथे व्यक्त करण्यास असमर्थ आहे. ती गोष्ट बघण्यासारखी होती! शेवटी मी तिला बोलताना ऐकल - " The flight is going to take off now, I can't serve you water."

वेळ झाली आणि सगळे प्रवासी जसे तसे सेटल झाले. मला हि थोड बर वाटल ... पण माझ्या मनात चुकूनही शंकेची पाल चूक-चुकली नाही, कि खरा प्रवास तर आता सुरु झाला होता! आमच्या पुढच्या रांगेत एक पुणेरी family बसली होती. आता मी कस ओळखल? Accent हो ! एकदम टिपिकल पुणेरी. एक छोटा मुलगा - १०-१२ वर्ष्यांचा आणि त्याचे आई वडील. कार्ट सारख गडबड करीत होत. काय त्रास होता त्याला, देव जाने. उजव्या बाजूला एक आजी - आजोबा होते. सीटचा बेल्ट कसा लावायचा, ह्यावर त्यांचा experiment सुरु होता. क्षणभर वाटल, त्यांची मदत करावी ... पण माझ्या आयुष्यात मी जेव्हा जेव्हा कोणाची मदत करायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा वाईट अनुभव आलेत, म्हणून मी गप्प बसलो. त्या आजीनी बिचार्या आजोबाला कमीत कमी ५ वेळा विचारलं. तुमचा मोबाईल कुठे आहे. आमच्याकडे बायकांना कुठलीही  गोष्ट १० वेळा विचारण्याची 'चांगली' सवय आहे. हि सवय पुरुषांना फारच त्रासदायक आहे, हे पण तेवढंच खर आहे.

विमान आकाश्यात स्थिर झालं. हवाई सुंदरी आपकी trolly घेऊन आली. आज काल 'स्वस्त' विमान सेवेचे दिवस आहेत. प्रत्येक वस्तू  घेण्या करता पैसे मोजावे लागतात. पण बिचार्या प्रवाश्यांना त्याची कलपना नसावी. ३-४ लोकांनी मजेत order दिल्यात. पण जेव्हा जेव्हा सुंदरीने त्यांना त्याची किंमत सांगितली, तेव्हा त्या orders cancel झाल्यात! पुढील सीटवरच कार्ट आता अस्वथ झाल होत. मी sandwich order केली आणि मी order केल्या पासून हे कार्ट माझ्या तोंडाकडे बघत होत. त्याला काही राहावल गेल नाही. ते त्याच्या बापाच्या मागे लागल "पप्पा, मला पण पाहिजे." त्याचा बाप बिचारा ... काही पर्याय नव्हता त्याला. ह्या अगोदर त्याने आपल्या कार्ट्याला १० वेळा सांगितलं होत, "हे जेवण चांगल नाही. आपली दशमी खा." पण पोरा समोर त्याला गुढगे टेकावे लागले.

सगळ्यात मजेदार गोष्ट - "गेट वेल सून" आणि "यूज मी"! आता तुम्ही म्हणाल काय हे? प्रवास आला म्हणजे आपल्याला इथे तीथे घान करण्याची चांगली सवय. कुठलाही प्रवास असो. माझ्या विमान प्रवासताही मी हे अनुभवल.

बरेच प्रवासी आप-आपल्या 'दशम्या', 'पोहे', 'पूरी आणि बटाट्याची भाजी' यांचा आस्वाद घेत होते. आता एवढ्या सर्व खाण्याच्या वस्तु आल्या म्हणजे बरोबरीला घान ही आलीच. एक कुटुंब आपली न्याहारी मजेत करीत होत. सर्व जेवणाचा पुरेपुर आस्वाद घेतले नंतर झालेली घान कुठे टाकायची हां प्रश्न त्यांच्या चेहर्यावर मी बघितला. दिसतो की हो ठोबाडावर, इलाज नाही, ठोबाड नेहमीच बोम्ब मारत. मी त्यांच्याकड़े कुतुहलाने बघत होतो. तेवढ्यात त्या कुटुंब प्रमुखाची नजर समोर ठेवलेल्या कागदी पिशवी कड़े गेली! अत्ता त्या पीशविवर "यूज मी" अस मोठ्या अक्षरात लिहिलेल होत. पण साहेबानी बहुधा ते वाचाल नाही, किव वाचून ही न वाचाल्यागत कल - जे ही खरो असो, पिशवी उचलली आणि फ्यामिलिने केलेली घान तय पिशवीत तकली. इथ पर्यंत "आल इज वेल." या पुढे ऐकाल तर .... जेव्हा हवाई सुंदरी दुसर्या राउंड ला आली, प्रवाश्यांचे उरले सुरले उरकायला, ह्या साहेबांनी ती पिशवी तीच्या पुढे केली! सुन्दरिचा चेहरा पहान्यसारखा होता. तीच्या उभ्या आयुष्यात तीने अस काही अनुभवले नसावे याची मला खात्री झाली! "गेट वेल सून" पीशवित कचरा टाकने हे आपलीच माणस करू शकतात याची मलाही खात्री झाली.


हे सगळ होत असताना, आजू बाजूला एकदम गोंधळ झाल्याची मला चाहूल लागली. बघतो तर काय, ४-५ गृहस्थ विमानाच्या मागच्या बाजूला गप्पा हाणीत होते. आणि नंतर ही मंडळी यत्र-तत्र-सर्वत्र फिरताना मला  दिसली. मला वाटले - जणू ह्या विमानात बसलेले सर्व प्रवाशी एकमेकास ओळखतात आणि आम्हीच आपले अनोळखी! मस्त गप्पा टप्पा आणि मजा चालू होती. एस टी महामंडळाची मला फार फार आठवण येत होती.

पण हे सर्व सुरु असताना दिल्ली ते पुणे प्रवासाचे २ तास कधी संपले याची जाणीव मला झालीच नाही!